शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 जानेवारी 2019 (16:12 IST)

रेल्वेच्या दोन पेक्षा अधिक तिकीटसाठी जादा पैसे मोजा

रेल्वे प्रवासासाठी दोन पेक्षा अधिक तिकिटे बुक करणार असाल तर तात्काळ तिकीट मिळवण्यासाठी तिकिटाच्या मूळ किंमतीपेक्षा अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. द्वितीय श्रेणीतील तत्काळ तिकिटावरही प्रवाशांना 10 टक्के तर इतर श्रेणीतील तिकिटांसाठी, मूळ दराच्या 30 टक्केपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागणार आहेत.
 
रेल्वे प्रशासनाने तत्काळ तिकिटाबाबत काही नियम बदलले असून, त्यातच दरवाढीची खरी मेख आहे. गर्दीच्या काळात प्रवाशांकडून तिकिटासाठी हवे तेवढे पैसे लुटणारी दलालांची टोळी सक्रिय असते. शिवाय ऑनलाईन पद्धतीने एकाच खात्यावरुन अधिक तिकिटे काढली जातात. त्यामुळे इतर प्रवाशांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी एका खात्यावरुन (रेल्वेचे खाते) कमाल 2 तिकिटे काढण्याची मर्यादा घालण्यात आली आहे.