शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (13:28 IST)

अमिताभ बच्चन झाले आजोबा, दारूच्या रिकाम्या बाटलीसह डांस पडला महागात, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी केली अटक

बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना जिल्ह्यातील बेतियाच्या नरकटियागंजची आहे, जिथे नातवाच्या सहाव्या वाढदिवसाच्या पार्टीत दारूच्या रिकाम्या बाटलीसोबत बार बालासोबत नाचणे आजोबांना महागात पडले आहे. डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई करत पोलिसांनी रविवारी डान्स करणाऱ्या वृद्धाला अटक केली. शिकारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सैदपूर येथील घटना आहे.
 
दारूच्या रिकाम्या बाटलीसह नृत्य 
मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सैदपूर येथील रहिवासी रमेश कुमार सिंह यांच्या घरी नातवाच्या बर्थडेची पार्टी होती. यादरम्यान ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. नातवाच्या जन्माच्या आनंदात आजोबा भावूक झाले आणि दारूची रिकामी बाटली घेऊन ऑर्केस्ट्राच्या तरुणीसोबत नाचू लागले, त्याचा व्हिडिओ कोणीतरी व्हायरल केला. व्हिडिओ व्हायरल होताच शिकारपूर पोलिसांनी कारवाई करत रमेश कुमार सिंगला अटक केली.
 
असे स्थानिक नागरिकांनी सांगितले
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, घरातील काही सदस्यांनी रमेश कुमार सिंह यांना दारूची रिकामी बाटली घेऊन नाचण्यास मनाई केली, मात्र तोपर्यंत कोणीतरी हा व्हिडिओ बनवून व्हायरल केला होता. त्याच वेळी, स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की दारूची बाटली रिकामी होती आणि गाण्यानुसार रमेश सिंह केवळ आपल्या भावना प्रदर्शित करत होते. मात्र बिहारमध्ये दारूबंदी कायदा लागू आहे आणि दारूची रिकामी बाटली मिळूनही पोलिस कारवाई करतात याचा त्यांना विसर पडला होता.
 
हा व्हिडिओ 16 जानेवारीचा आहे. मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी रविवारी त्या व्यक्तीला अटक करून तुरुंगात पाठवले. मात्र, रमेशने दारू प्यायली होती की नाही याचा पुरावा नाही.