गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 9 मार्च 2018 (11:20 IST)

दाऊदचा साथीदार फारूख टकलाला दुबईतून अटक

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार फारूख टकलाला सीबीआयने दुबईतून अटक केली आहे. 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर 1995 मध्ये टकलाविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.
 
फारूख टकला गुरुवारी सकाळी एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत सीबीआयच्या कार्यालयात आणण्यात आले. त्याची सध्या कसून चौकशी सुरू आहे. यानंतर त्याला टाडा न्यायालयात हजर केले जाणार आहे. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांत 257 जणांचा मृत्यू झाला होता. 700 हून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणी 129 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.