शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 3 मे 2023 (18:03 IST)

Delhi Hit And Run: कार चालकाने 2 तरुणांना उडवलं

राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे .दुचाकीवर असलेल्या दोन तरुणांना एका वेगाने असलेल्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक तरुण रस्त्यावर दूर जाऊन पडला तर दुसरा तरुण कारच्या छतावर जाऊन पडला तरीही  कार चालक वेगाने कार चालवत होता. 
 
चालकाने 3 किलोमीटर कार चालवत नेली नंतर या तरुणाला दिल्ली गेट जवळ फेकून पळ काढला. या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला.दुसरा तरुण जखमी आहे. मयत तरुणाचे नाव दीपांशु वर्मा असून जखमीचे नाव मुकुल आहे. हे दोघे मावस भाऊ असून दीपांशु हा एकुलता एक होता.तो दागिन्यांचे दुकान चालवत होता.  

सदर घटना केजी मार्ग-टॉलस्टॉय मार्गाच्या लाल दिव्यावर घडली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
ही संपूर्ण घटना घटनास्थळी उपस्थित एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केली असून त्यांनी आपल्या स्कुटीने आरोपी कारचालकाचा पाठलाग केला तरीही आरोपी वेगाने कार चालवत होता. पोलिसांनी आरोपीला या प्रकरणात अटक केली आहे. 
 
  Edited By - Priya Dixit