1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 7 फेब्रुवारी 2019 (09:05 IST)

न्यायलयीन प्रविष्ठ खटल्यात मत सार्वजनिक नको, नाहीतर ब्रम्हास्त्र उपयोग करू - सुप्रीम कोर्ट

कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी शिक्षा देणे हे ब्रह्मास्त्र आहे. त्यामुळे ते फार जपूनचं वापरावं लागतं, असे मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले. एखाद्या खटल्यांच्या सुनावणीवरील वार्तांकनावर आमचा कोणताही आक्षेप नाही, मात्र खटल्याशी संबंधित वकिलांनी न्यायप्रविष्ट प्रकरणात वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत सहभागी होण्याचे प्रकार हल्ली रोजच घडतात, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. १० ते ५० वर्षे या वयोगटातील महिलांच्या मंदिरातील प्रवेशबंदीमुळे लिंग आधारित भेदभाव होत असल्याचे सांगून तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्र यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांच्या घटनापीठाने गेल्या वर्षी २८ सप्टेंबरला सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेशाचा मार्ग मोकळा केला. तर या निकालावर फेरविचार करावा, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली गेली. याचिकावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह रोहिंग्टन नरिमन, अजय खानविलकर, धनंजय चंद्रचूड व इंदू मल्होत्रा यांच्या घटनापीठासमोर या याचिकेवर सुनावणी केली. सुनावणीदरम्यान, अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी वकील प्रशांत भूषण यांचा ट्विटचा दाखला दिला. प्रशांत भूषण यांना कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी शिक्षा होऊ नये. पण न्यायप्रविष्ट प्रकरणात वकिलाने सार्वजनिक स्तरावर काय बोलावे, याची मर्यादा आखून द्यावी, असे त्यांनी सांगितले. यांवर मग कोर्टाने चांगलेच झापले आहे. कोर्टाची मर्यादा पाळायला हवी असे मत व्यक्त केले आहे.