मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जानेवारी 2018 (09:47 IST)

डॉक्टरांचा लाक्षणिक संप

इंडियन मेडिकल असोशिएशनच्या म्हणजेच आयएमएच्या देशभरातल्या डॉक्टरांनी आज १२ तासाचा लाक्षणिक संप पुकारला आहे.केंद्र सरकार आणत असलेल्या नॅशनल मेडिकल कौन्सिल म्हणजेच एनएमसी विधेयकातील तरतुदींना आयएमएचा विरोध आहे. या विधेयकात मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया म्हणजे एमएमसीच्या ऐवजी नँशनल मेडिकल कमिशन अर्थात एनएमसी अस्तित्वात येणार आहे. याला विरोध म्हणून देशभरातील आपली खाजगी प्रँक्टीस बंद ठेवून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करणार आहेत. राज्यातील ४० लाख डॉक्टरही प्रँक्टीस बंद ठेवणार आहेत.

सरकारनं आणलेल्या नव्या विधेयकानुसार होमिओपथी, आयुर्वेद आणि इतर उपचार पद्धतींचा अभ्यास करून पदवी मिळाल्यावर एक छोटा कोर्स करून अॅलोपथीची प्रॅक्टीस करणे शक्य होणार आहे. ही तरतूद अस्तित्वात आल्यास रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी भीती इंडियन मेडिकल असोशिएशननं व्यक्त केली आहे.