बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 25 मे 2019 (09:51 IST)

इनर्शिअली गाईडेड बॉम्बची यशस्वी चाचणी

भारताच्या संरक्षण संशोधन विकास संस्था डीआरडीओने ५०० किलो वजनाच्या इनर्शिअली गाईडेड बॉम्बची यशस्वी चाचणी केली. राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील पोखरण रेंजवर ही चाचणी करण्यात आली. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने डीआरडीओचे हे महत्वपूर्ण यश आहे.
 
संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचा हा गाईडेड बॉम्ब डीआरडीओने विकसित केला आहे. या गाईडेड बॉम्बने ३० किलोमीटरवरील लक्ष्याचा अत्यंत अचूक वेध घेतला.