सहावी मुलगी झाली म्हणून पित्याने उचलले धक्कादायक पाऊल, आता तुरुंगात
समाजात मुलगी वाचवण्यासाठी अनेक कार्यक्रम सुरू असले तरी लोकांचे विचार बदलणे सोपे नाही हे वेळोवेळी कळून येतं. धक्कादायक प्रकरण दिल्ली येथील गांधीनगर येथील आहे जिथे एका बापाने आपल्या तीन दिवसाच्या चिमुरडीची हत्या केली. विष्णू कानुजी राठोड असं आरोपी पित्याचं नाव आहे.
सहावी मुलगी झाली म्हणून संतापलेल्या एका पित्याने चाकू खुपसून हत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. या प्रकरणी मुलीच्या आईने पोलिसात धाव घेतली आणि पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे.
माहितीनुसार विष्णूला याआधी पाच मुली आहेत. आणि सहावी मुलगी झाल्याने संतापलेल्या विष्णूने अत्यंत क्रूरतेने मुलीला मारहाण केली. नंतर तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीच्या आईने आणि काही नातेवाइकांनी त्याला पकडलं. चिमुकली गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अवस्था गंभीर असल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला.