testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बना सरकारी अधिकारी, यूपीएससीची गरज नाही

Last Modified सोमवार, 11 जून 2018 (09:10 IST)

मोदी सरकारने केंद्रातील

१० महत्त्वाच्या खात्यांमध्ये सहसचिवांच्या नेमणुका ‘लॅटरल एन्ट्री’ पद्धतीने थेट करण्याचा निर्णय घेतला आहे. हे करत असताना सरकारने संबंधित विषयातील ज्ञान आणि अनुभव हा एकमेव निकष
ठेवत ही पदे खासगी उद्योगांतील व्यक्तींसाठीही खुली केली आहेत.
त्यामुळे
सनदी अधिकाऱ्यांची निवड केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) करण्याच्या प्रचलित पद्धतीला
छेद दिला आहे.
महसूल, वित्तीय सेवा, आर्थिक बाबी, कृषी, रस्ते वाहतूक व महामार्ग, जलवाहतूक, पर्यावरण आणि वने, नवीन आणि अक्षय ऊर्जासाधने, नागरी विमान वाहतूक आणि वाणिज्य या १० विभाग/खात्यांमधील सहसचिवांची पदे या पद्धतीने भरण्यात येणार आहेत.

निवडलेल्या उमेदवारांची संबंधित खात्यात सहसचिव म्हणून कंत्राटी पद्धतीने नेमणूक केली जाईल. सुरुवातीस हे कंत्राट तीन वर्षांसाठी असेल व ते पाच वर्षांपर्यंत वाढविले जाऊ शकेल. या सहसचिवांना सातव्या वेतन आयोगानुसार दरमहा १,४४,२०० ते २,१८,२०० या ‘पे मॅट्रिक्स’मध्ये पगार मिळेल. याखेरीज सरकारमधील समकक्ष पदावरील अधिकाºयाला मिळणारे भत्ते व अन्य सुविधाही त्यांना मिळतील. उमेदवाराची निवड समितीकडून व्यक्तिगत मुलाखतीनंतर केली जाईल.ही योजना खुली आहे. या जागांसाठी
इच्छुकांना १५ जून ते ३० जुलै
या काळात फक्त आॅनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. उमेदवाराचे किमान वय १ जुलै
रोजी ४० वर्षे असायला हवे.यावर अधिक वाचा :

Assembly Election Results 2018

 

राम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत

national news
मागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...

कांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर

national news
दुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...

खासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...

national news
खासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...

विजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना

national news
भारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...

भारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...

national news
भारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...
Widgets Magazine