testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

लवकरच शंभर रुपयांचं नाणं येणार

Last Modified बुधवार, 13 सप्टेंबर 2017 (10:52 IST)

सरकार लवकरच शंभर रुपयांचं नाणं जारी करणार आहे. सोबतच पाच रुपयांचं नवं नाणंही जारी करण्यात येणार आहे. डॉ. एम. जी रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ही नाणी जारी करण्यात येतील.

शंभर रुपयांचं नाणं 44 मिमी आणि 35 ग्रॅम वजनाचं असेल. नाण्याच्या वरच्या बाजूला अशोत स्तंभ असेल आणि त्याच्या खाली सत्यमेव जयते लिहिलेलं असेल. अशोक स्तंभ, भारत आणि INDIA असं वेगवेगळ्या बाजूला लिहिलेलं असेल.

त्याखाली अंकामध्ये 100 लिहिलेलं असेल. नाण्याच्या मागील बाजूवर एम. जी. रामचंद्रन यांचा फोटो असेल. फोटोच्या खाली 1917 ते 2017 असं लिहिलेलं असेल. चार धातूंनी मिळून शंभर रुपयांचं हे नाणं तयार करण्यात येणार आहे.


पाच रुपयांचं नवं नाणं 23 मिमी आणि 6 ग्रॅम वजनाचं असेल. नाण्याच्या वरच्या बाजूला अशोत स्तंभ असेल आणि त्याच्या खाली सत्यमेव जयते लिहिलेलं असेल. अशोक स्तंभ, भारत आणि INDIA असं वेगवेगळ्या बाजूला लिहिलेलं असेल.त्याखाली अंकामध्ये 5 लिहिलेलं असेल. नाण्याच्या मागील बाजूवर एम. जी. रामचंद्रन यांचा फोटो असेल. फोटोच्या खाली 1917 ते 2017 असं लिहिलेलं असेल. तीन धातूंनी मिळून शंभर रुपयांचं हे नाणं तयार करण्यात येणार आहे.यावर अधिक वाचा :