गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 16 डिसेंबर 2017 (15:25 IST)

गुजरात : रविवारी सहा मतदान केंद्रांवर फेरमतदान

विविध राजकीय पक्षांकडून इव्हीएममध्ये छेडछाडी आणि तांत्रिकदृष्ट्या गोंधळ झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर गुजरात  येथील सहा मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. रविवारी सकाळी संबंधीत केंद्रांवर मतदान होणार आहे. तीन मतदारसंघात फेरमतदान होणार असलेल्या मतदान केंद्रांमध्ये अहमदाबाद जिल्ह्यातील दसक्रोई, विरामगाम तर बांसकंथा जिल्ह्यातील वडगाम या केंद्रांचा समावेश आहे. त्याचबरोबर इतरही मतदान केंद्रांचा यात समावेश आहे.

दोन तीन केंद्रांवर एकाला मतदान केल्यानंतर काँग्रेसला पाठींबा दर्शवलेले अपक्ष उमेदवार जिग्नेश मेवानी यांच्या नावासमोरील दिवा लागत असल्याचे समोर आले होते. यामुळे स्थानिकांनी या मतदानावर आक्षेप घेत निषेध नोंदवला. या प्रकरणाची चौकशी करुन येथे फेरमतदान घेण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली होती.