testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

राम रहिम सिंग यांच्या शिक्षेवर आज फैसला

बलात्कारप्रकरणात दोषी ठरलेल्या डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमित राम रहिम सिंग यांच्या शिक्षेचा फैसला आज (सोमवारी) होणार आहे. दुपारी पावणे तीनच्या सुमारास रोहतकमधील तुरुंगात ही सुनावणी होणार असून या पार्श्वभूमीवर हरयाणा आणि पंजाबमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गुरमित राम रहिम सिंग यांना गेल्या आठवड्यात बलात्काराच्या प्रकरणात दोषी ठरवले होते. १५ वर्षांपूर्वी दोन महिला अनुयायांवरील बलात्काराप्रकरणी बाबा राम रहिम यांना दोषी ठरवण्यात आले होते. न्यायालयाच्या निकालानंतर हरयाणासह पंजाबमध्ये हिंसाचार झाला होता. यात सुमारे ३८ जणांचा मृत्यू झाला होता.
सीबीआयचे विशेष न्यायालय बाबा राम रहिम यांना आज शिक्षा सुनावणार आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गुरमित राम रहिम यांना न्यायालयात न नेण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संदीप सिंह हे रोहतकमधील सुनरिया कारागृहात जाऊन शिक्षा जाहीर करतील. बाबा राम रहिम यांना सात किंवा दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते.


यावर अधिक वाचा :