सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 22 जानेवारी 2023 (15:51 IST)

पत्नीशी प्रेमसंबंध पतीने केले मित्राचे 20 तुकडे, आरोपीला अटक

murder
गाझियाबाद (यूपी गाझियाबाद) येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पत्नीच्या प्रेमसंबंधाच्या संशयावरून पतीने एका तरुणाची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी हत्येतील आरोपीला अटक करून त्याची चौकशी सुरू केली आहे. 
 
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये निर्घृण हत्येची भीषण घटना समोर आली आहे. येथे अवैध संबंधांच्या संशयावरून पतीने पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्याचा आरोप.आहे. मृतदेह बाहेर फेकून आरोपी पळून गेला होता. याप्रकरणी पोलिसांनी हत्येतील आरोपीला अटक करून त्याची चौकशी सुरू केली आहे 
 
गाझियाबादमधील खोडा पोलीस ठाण्यांतर्गत लोधी चौकात राहणाऱ्या मीलालने 19-20 जानेवारीच्या रात्री अक्षय नावाच्या तरुणाची हत्या केली.आरोपी पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे धारदार शस्त्राने 20 तुकडे करून फेकून दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. 
 
परिसरातील नागरिकांनी मृतदेह बेवारस पडलेला पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ परिसरातील पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहब्यात घेऊन तपास सुरू केला. मृताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांची चौकशी केली. 
 
यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली. पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच आरोपींवर कारवाई करण्यात आली.याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेबाबत त्याची चौकशी करण्यात येत आहे. 
 
Edited by - Priya Dixit