सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 5 मार्च 2018 (17:10 IST)

धक्कादायक : दोन महिन्यात शंभरच्या वर बिबट्यांचा मृत्यू

आपल्या देशात चिंताजनक अशी आकडेवारी आली आहे. जंगलाचा होणारा ऱ्हास आता बिबट्याच्या जीवावर बेतला आहे. यामध्ये आपल्या देशातील मागील २ महिन्यामध्ये जवळपास १०६ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे वनविभागात  खळबळ उडाली आहे. तर चिंताजनक बाब अशी की की फक्त १२ बिबट्यांचा मृत्यू नैसर्गिक पद्धतीने झाला आहे. वन्यजीव संरक्षण सोसायटी ऑफ इंडियाने (Wildlife Protection Society of India) ही आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मार्जार कुळातील बिबट्या हा प्राणी येत्या काही वर्षांत आल्प्या देशातून नामशेष तर होणार नाही ना? असा प्रश्न सध्या प्राणीप्रेमी उपस्थित करत आहेत.
 
डब्लूपीएसआयच्या आकडेवारीनुसार, २०१८च्या सुरुवातीच्या २ महिन्यांत बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्यामागे शिकार हे प्रमुख कारण आहे. यामध्ये चिंताजनक असे की डब्लूपीएसच्या आकडेवारीनुसार, ३६ बिबट्यांच्या मृत्युमागील कारण स्पष्ट झालेले नाही, १८ बिबट्यांची शिकार झाल्याचे त्यांच्या अवशेषांवरील गोळ्यांच्या निशाणांवरून स्पष्ट झाले आहे. तसेच रस्त्यावर गाड्यांच्या धडकेमुळे मृत्यू पावलेल्या बिबट्यांची संख्या ८ आहे, तर काही बिबट्यांचा मृत्यू वाघ किंवा अन्य जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात झाल्याचे आकडेवारीत नमूद केले आहे. त्यामुळे आपण वेळीच पावले उचलली नाहीत तर मोठा अनर्थ होणार आहे.