1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 26 डिसेंबर 2017 (16:40 IST)

कुलभूषण यांच्या आई पत्नीची सुषमा स्वराज यांच्या सोबत भेट

jadhav mother and wife
पाकीस्तान येथे खोट्या हेरगिरीच्या आरोपावरुन कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नी यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. त्यावेळी त्यांच्या सोबत परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव जयशंकरही उपस्थित होते. कुलभूषण यांची आई आणि पत्नी यांनी इस्लामाबादेत कुलभूषण यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या पहाटे दिल्लीला परतले आहेत. कुलभूषण यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कुलभूषण जाधव यांची त्यांच्या कुटुंबीयांनी काल पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात भेट घेतली. त्यांची काचे आडून इंटरकॉमच्या माध्यमातून सुमारे अर्धात तास भेट झाली आहे. भारताने आंतराष्ट्रीय दबाव टाकत कुलभूषण यांची फाशी थांबवली आहे.