testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

छत्तीसगड : ज्येष्ठ पत्रकार विनोद वर्मा यांना अटक

Last Modified शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017 (12:00 IST)

ज्येष्ठ पत्रकार विनोद वर्मा यांना शुक्रवारी छत्तीसगड पोलिसांनी अटक केली. छत्तीसगडमधील भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री राजेश कुमार यांना ब्लॅकमेल केल्याच्या आरोपावरुन त्यांना अटक करण्यात आली आहे.गाझियाबादमधील निवासस्थानातून विनोद वर्मा यांना अटक करण्यात आली.

छत्तीसगडमधील मंत्री राजेश कुमार यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ वर्मा यांच्या हाती लागले होते. या व्हिडिओच्या आधारे वर्मा यांनी मला ब्लॅकमेल केले आणि माझ्याकडून खंडणी मागितली, असा आरोप राजेश कुमार यांनी केला आहे. पोलिसांनी विनोद वर्मा यांच्या घरातून ५०० हून अधिक सीडी जप्त केल्या आहेत. विनोद वर्मा यांना पुढील चौकशीसाठी रायपूरच्या पोलीस ठाण्यात नेण्यात येईल, असे समजते.

विनोद वर्मा हे बीबीसीचे माजी पत्रकार असून अमर उजालाच्या डिजिटल विभागाचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. एडिटर्स गिल्डचे ते सदस्यदेखील आहे.यावर अधिक वाचा :