गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 22 मे 2023 (11:00 IST)

बलिया येथे मोठी दुर्घटना : गंगा नदीत बोट उलटली,40 जण बुडाले

boat
उत्तर प्रदेशातील बलिया येथून गंगा नदीत 40 जणांना घेऊन जाणारी बोट उलटून मोठी दुर्घटना झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात दोन डझनहून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, बलिया जिल्ह्यातील मालदेपूर गंगा घाट येथे ही घटना घडली, कुटुंबातील सदस्य मुंडन संस्कारासाठी जात होते. कुटुंबातील सर्व लोक बोटीतून जात असताना अचानक बोट उलटली. लोकांचा आरडाओरडा ऐकून स्थानिक मदतीसाठी धावले. अर्धा डझन लोकांना रुग्णालयात नेण्यात आले. तर दोन जणांचा मृत्यू झाला.
 
20 ते 25 लोक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे. त्यांचा शोध घेण्यात येत होता. स्थानिक प्रशासनही घटनास्थळी पोहोचले आहे.


Edited by - Priya Dixit