testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मोदींची महत्त्वाकांक्षी योजना, 10 कोटी लोकांना मिळणार रोजगार

नीती आयोगाचे महानिदेशक-डीएमईओ आणि सल्लागार ‍अनिल श्रीवास्तव यांनी दावा केला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना मेक इन इंडिया मुळे 2020 पर्यंत 10 कोटी रोजगार पैदा होणार. श्रीवास्तव यांनी दावा केला की भारत चौथ्या तांत्रिक क्रांती चरणातून निघत असून यात तांत्रिकीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. मेक इन इंडियाद्वारे आम्ही 2020 पर्यंत 10 कोटी नवीन रोजगार पैदा करण्याच्या लक्ष्यासह पुढे वाढत आहोत.
उल्लेखनीय आहे की मागील काही वर्षात सरकारने मेक इन इंडिया आणि स्टार्ट अप इंडिया सारख्या योजनांद्वारे देशात गुंतवणुकीची नवीन शक्यता शोधण्याच्या प्रयत्नात आहे. मेक इन इंडिया अंतर्गत सरकार निर्माण क्षेत्रात फोकस करत असून काही महिन्यातच मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळण्याची उमेद आहे.

दोन वर्षांत 107 नवीन मॅन्युफॅक्चरिंग यूनिट्सने मेक इन इंडियाद्वारे सरकार भारताला ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून तयार करू इच्छित आहे. या प्रयत्नांमुळेच मागील दोन वर्षात 107 नवीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स स्थापित करण्यात आल्या आहेत.


यावर अधिक वाचा :