testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दाऊदचा हस्तक मानला जाणारा छोटा शकीलचा मृत्यू ?

इस्लामाबाद| Last Modified गुरूवार, 21 डिसेंबर 2017 (11:32 IST)
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक मानला जाणारा छोटा शकीलचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार ६ जानेवारीला छोटा शकील इस्लामाबादमध्ये त्याच्या काही कामासाठी गेला होता. त्याचवेळी त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्याला रावळपिंडीतील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

तर दुसऱ्या एका माहितीनुसार छोटा शकीलला आयएसआयने ठार केल्याचे वृत्त आहे. छोटा शकील आयएसआयच्या मार्गातील अडथळा ठरत असल्याने त्यांनी छोटा शकीलला मारल्याचे सांगण्यात येत आहे.


यावर अधिक वाचा :