testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अंतराळ यानाच्या स्फोटात 3 देशांचे अंतराळ यात्री ठार

spacecraft
वॉशिंग्टन (अमेरिका)| Last Modified बुधवार, 20 डिसेंबर 2017 (09:17 IST)
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर निघालेल्या अंतराऴ यानाच्या दुर्घटनेत तीन अंतराळ यात्री ठार झाल्याची माहिती नासाने दिली आहे. हे तीन अंतराळ प्रवासी अनुक्रमे अमेरिका, रशिया आणि जपान या तीन देशांचे होते. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देण्यासाठी हे अंतराळ वीर निघाले होते.
कझाकस्थानवरून निघालेले हे अंतराळ यान पृथ्वीपासूनन्‌ सुमारे 400 किमी उंचावर असताना दुर्घटनाग्रस्त होऊन त्याचे तुकडे तुकडे झाले, या अपघातातून कोणीही अंतराल यात्री जिवंत राहण्याची शक्‍यता नाही असे नासाने म्हटले आहे. मरण पावलेल्या अंतराळ यात्रींमध्ये रशियाचे एंटन शकाप्लेरॉव (कमांडर), जपानचे नौरिशिजे कनाई (फ्लाइट इंजिनीयर) आणि अमेरिकेचे स्कॉट टिंगल (इंजिनीयर) यांचा समावेश आहे, एंटन शकाप्लेरॉव, नौरिशिजे कनाई आणि स्कॉट टिंगल हे स्पेसस्टेशनमध्ये रशियन अलेक्‍झांडर मिसुरर्कीन यांची भेट घेणार होते.


यावर अधिक वाचा :