Widgets Magazine

हत्तीसोबत सेल्फी काढणे बेतले जीवावर

elephant
सुंदरगड- ओदिशाच्या सुंदरगडमध्ये जंगलातील हत्तीसोबत सेल्फी काढण्याची हौस एका व्यक्तीच्या जीवावर बेतली. अशोक भारती असे या व्यक्तीचे नाव आहे. जंगलातून जात असताना त्यांच्यापासून काही अंतरावर असलेल्या हत्तीसोबत सेल्फी काढण्याचा मोह अशोक यांना झाला. त्यासाठी त्यांनी पोझही घेतली. मात्र, तेवढ्यात हत्ती अशोक यांच्या अंगावर धावून आला.
काही काळायच्या आतच हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला. हा हत्ती आधीच काही कारणांनी पिसाळला होता. हत्तीने त्यांना सोंडेत पकडले होते. स्थानिकांच्या मदतीने त्यांना हत्तीच्या तावडीतून सोडवण्याचे खूप प्रयत्न केला.
मात्र
हत्ती पिसाळलेला असल्याने ते शक्य झाले नाही. त्यामुळे या हल्ल्यात अशोक भारती गंभीररित्या जखमी झाले. सुरूवातीला भारती केवळ हत्तीसोचे फोटो काढत होते. मात्र हत्ती त्यांच्या दिशेने वळल्यानंतर त्यांना हत्तीसोबत सेल्फी काढण्याचा मोह झाला आणि ही दुर्घटना घडली.
जखमी झालेल्या भारती यांना राउरकेला येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


यावर अधिक वाचा :