testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मोदी यांची लोकप्रियता कायम

पंतप्रधान नरेंद्र आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खूप पुढे आहेत. अमेरिकन थिंक टँक प्यू रिचर्सच्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. या सर्वेक्षणात मोदी ८८ टक्क्यांसह पहिल्या स्थानावर आहेत. तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी ५८ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (५७ टक्के) यांचा क्रमांक लागतो.
प्यू रिसर्च संस्थेने २,४६४ भारतीयांशी संवाद साधून सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर केली. २१ फेब्रुवारी ते १० मार्च दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. या कालावधीत उत्तर प्रदेशासह पाच राज्यांमध्ये निवडणुका सुरु होत्या. ‘बहुतांश जनता देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल समाधानी आहे. त्यामुळेच मोदींची लोकप्रियता कायम आहे,’ असे प्यू रिसर्च संस्थेने म्हटले आहे. दर दहापैकी आठ भारतीयांना देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती ‘चांगली’ वाटते, अशी आकडेवारी संस्थेने दिली आहे.यावर अधिक वाचा :