शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 7 फेब्रुवारी 2018 (13:50 IST)

जोशमध्ये मोदी, काँग्रेसवर केली टीका

लोकसभेत विरोधकांच्या गदारोळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरु आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत उत्तर देत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसला खडे बोल सुनावत आहेत. विरोधक टीका करताना तीच कॅसेट पुन्हा पुन्हा चालवतात असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला आहे. तुमच्याकडे इतका वेळ होता, पण फक्त एका कुटुंबांच गुणगान गाण्यात सर्व शक्ती घालवली, अशीही टीका त्यांनी केली आहे. 
 
'तुम्ही भारताचे तुकडे केलेत, तरीही देशातील जनता तुमच्यासोबत राहली. देशावर तुम्ही राज्य करत होतात. विरोधी पक्ष जणू अस्तित्वातच नव्हता. काँग्रेसनं इतकी वर्ष एकाच कुटुंबाचं गुणगान गायलं. देशाने एकाच कुटुंबाला ओळखावं यासाठी सगळी शक्ती पणाला लावली. तुमची वृत्ती चांगली असती तर हा देश कितीतरी पुढे गेला असता', असं नरेंद्र मोदी बोलले आहेत. 
 
दरम्यान विरोधकांचा गरादोळ सुरुच असून झुटा भाषण बंद करो, झुटे आश्वासन बंद करो, अशी घोषणाबाजी विरोधक करत आहेत. क्या हुआा, क्या हुआ, 15 लाख का क्या हुआ? अशाही घोषणा यावेळी दिल्या जात आहेत.
 
देशाला लोकशाही काँग्रेसनं किंवा नेहरुंनी दिलेली नाही. लोकशाही ही आमच्या रक्तात आहे, आणची परंपरा आहे.  तुम्ही लोकशाहीच्या गप्पा मारता? तुमचे पंतप्रधान राजीव गांधींनी हैदराबाद विमानतळावर आपल्याच पक्षाच्या दलित मुख्यमंत्र्यांना सर्वांसमोर अपमानित केलं होतं', ही आठवण नरेंद्र मोदींनी काँग्रेसला करुन दिली. 
 
'आम्हाला तुम्ही लोकशाही शिकवू नका. तुम्हाला ते शोभून दिसत नाही. सरदार वल्लभभाई पटेल जर देशाचे पहिले पंतप्रधान असते, त संपूर्ण काश्मीर आपलं असतं. आपल्यानंतर स्वातंत्र्य झालेल्या अनेक देशांनी प्रगती केली आहे हे मान्य करा', असं नरेंद्र मोदी बोललेत.
 
'आवाज दाबण्याचा जो प्रयत्न होतोय, तो यशस्वी होणार नाही याची मला खात्री आहे. काँग्रेसने पसरवलेल्या विषाची किंमत सर्व देशवासीयांना चुकवावी लागतेय. आज हा देश ज्या ठिकाणी आहे, त्यात आजवरच्या सर्व सरकारांचं योगदान असल्याचं मी लाल किल्ल्यावरून म्हटलं. हे सौजन्य काँग्रेसच्या एकाही नेत्यानं दाखवलं नाही', असा टोला मोदींनी लगावला. 
 
'२०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर आम्ही ईशान्य भारतावर लक्ष केंद्रीत केलं आणि तिथे विकासाची कामं केली. तुम्ही डोळे बंद करुन ठेवलेत, फक्त आपलं गुणगान गाण्यात व्यस्त आहात. 80 च्या दशतकात 21 व्या दशकाचं स्वप्न दाखवलं जात होतं पण साधी एव्हिएशन पॉलिसी तुम्ही आणू शकला नाहीत', अशी टीका मोदींनी केली. 
 
'ही योजना आमची होती, ही कल्पना आमची होती, असं हे म्हणतात. पण तुमची काम करण्याची पद्धत काय होती? जोपर्यंत नातेवाईंची जुळवाजुळव होत नाही, गाडी पुढे जाणार नाही. केरळमध्ये काँग्रेस कसा वागला?, पंजाबमध्ये त्यांनी अकाली दलाला कशी वागणूक दिली?, तामिळनाडूत ते कसे वागले? ही लोकशाहीबद्दलची कटिबद्धता नव्हती', असे अनेक प्रश्न मोदींनी विचारले. नरेंद्र मोदी आधार पुढे येऊन देणार नाही अशी टीका होत होती. पण जेव्हा ते लागू करण्यात आलं तेव्हा त्याच्या प्रक्रियेवर टीका करु लागले', असं मोदींनी म्हटलं.