खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यावर प्रचारबंदीची कारवाई केली आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल असून, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला आहे. ममता दीदींवर झालेल्या कारवाईमागे भाजप असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी एक ट्विट करत भाजपवर टीका केली आहे. निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्यावर २४ तासांची प्रचारबंदी घातली आहे. केंद्रात सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपच्या आदेशासार ही कारवाई करण्यात आली आहे. हा लोकशाही आणि भारताच्या स्वतंत्र संस्थांच्या सार्वभौमत्वावर थेट हल्ला आहे, अशी टीका करत संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दर्शवला आहे.