शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 21 डिसेंबर 2017 (15:27 IST)

अखेर ट्रिपल तलाख कायदा होणार शुक्रवारी संसदेत

विवादात आणि मुस्लीम महिलांना सन्मान प्राप्त करवून देणारा ट्रिपल तलाख कायदा होणार असून तो शुक्रवारी संसदेत मांडला जाणार आहे. यामध्ये सरकार  संसदेत मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक सादर करणार आहे. संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी या संदर्भातील माहिती पत्रकारांना दिली आहे. मागील  आठवड्यात कॅबिनेटनं विधेयकास मंजुरी दिली. सरकारनं हे विधेयक पास करण्यासाठी संपूर्ण तयारी केली असून  भाजपानं पक्षातील सर्व खासदारांना व्हिप जारी करुन संसदेत हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे हा कायदा   कायदा मंजूर होणार हे स्पष्ट आहे.  सरकार ट्रिपल तलाकला दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा ठरवण्याच्या दृष्टीनं हे विधेयक सादर करणार असून  विधेयकात पुन्हा एकदा ट्रिपल तलाक देणा-या व्यक्तीला तीन वर्षांच्या  कारावासाची शिक्षा  सोबत दंड देण्यात येणार आहे. यामध्ये  कायदेमंत्री रवी शंकर प्रसाद ट्रिपल तलाकवरील विधेयक सादर करणार . यामध्ये मुस्लीम पुरुष हा तिहेरी तलाक देतो.  तलाक या अरबी शब्दाचा अर्थ घटस्फोट असा होतो.  पुरुष तीनवेळा तलाक शब्दाचे उच्चारण करुन पत्नीशी कायमचा वेगळा राहू शकतो, फक्त या शब्दाच्या तीनदा उच्चारणाने घटस्फोट मिळतो. मात्र हा तलाख अर्थात एक तर्फी असतो कोणतेही कारण नसताना महिलेला तलाख दिला जातो त्यामुळे ही पद्धत महिलांवर अन्याय करणारी आहे. या विरोधात अनेक मुस्लीम महिलांनी आवाज उठवला आहे.