शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गांधीनगर , शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018 (12:22 IST)

आमचा एक रुपया गरिबांपर्यंत पोहोचतो - पंतप्रधान

गुजरातमध्ये सर्वांसाठी घर माध्यमातून आतापर्यंत 1 लाख घरांची र्नितिी करण्यात आली आहे. देशातील प्रत्येक कुटुंबाला 2022 पर्यंत घरकूल देण्याचे स्वप्न असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
 
भारतीय स्वातंत्र्यदिनाला 2022 ध्ये 75 वर्षे पूर्ण होत असल्याने सरकारने लक्ष्य ठेवल्याचे मोदींनी नमूद केले. या योजनेसाठी एक रुपयाही लाचेचा प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली जाईल असे मोदी म्हणाले. 
 
पंतप्रधान मोदी गुजरातच्या एक दिवसाच्या दौर्‍यावर असून त्यांनी विविध प्रकल्पांचे उद्‌घाटन केले. त्याचबरोबर गुजरातधील फॉरेन्स सायन्स विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला त्यांनी उपस्थिती लावली. आपल्या सरकारमध्ये कमिशन व्यवस्थेला कोणतीही जागा नसल्याचे त्यांनी सांगितले.
 
जर सरकारने गरिबांसाठी एक रुपया देऊ केला, तर तो आहे तसा त्यांच्यापर्यंत पोहोचतो असे ते म्हणाले. काँग्रेसचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी एकदा केंद्र सरकारने एक रुपया दिला, तर गरिबांपर्यंत केवळ 15 पैसे पोहोचतात असा दावा केला होता, तवर मोदींनी हे विधान केले.