शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पुन्हा दिसून आलं नवजोतसिंह सिद्धूचं पाकिस्तान प्रेम

जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये पाकिस्तानी दहशतवादी संघटनाने केलेल्या भ्याड हल्ल्याची निंदा करत पंजाबचे मंत्री नवजोत सिंह सिद्धूचे पाकिस्तान प्रेम पुन्हा दिसून आले. त्यांनी प्रश्न केला की काय काही लोकांच्या कृत्यामुळे पूर्ण देशाला जवाबदार ठरवलं जाऊ शकतं?
 
या हल्ल्यात सीआरपीएचे 40 हून अधिक जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तान स्थित जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघाती हल्लाखोराने 100 किलो विस्फोटकाने भरलेली गाडीने जवानांच्या बसला टक्कर दिली.
 
पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावर इमरान खान यांच्या शपथ ग्रहण समारंभात सामील होणार्‍या क्रिकेटर ते नेते बनलेल्या सिद्धू यांनी म्हटले की काही लोकांमुळे काय आपण पूर्ण देशाला यासाठी जवाबदार ठरवू शकतो का? आणि काय एखाद्या व्यक्तीला जवयाबदार ठरवू शकता?
 
सिद्ध हे देखील म्हणाले की ही भ्याड हल्ला असून मी याची निंदा करतो. हिंसा नेहमी निंदनीय आहे यासाठी जवाबदार लोकांना शिक्षा मिळालीच पाहिजे.