शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 20 नोव्हेंबर 2023 (12:34 IST)

उत्तरकाशीतील बोगद्यातून मजुरांना बाहेर काढण्यासाठी आता 5 कंपन्या एकत्र प्रयत्न करणार

uttarkashi tunnel accident
उत्तरकाशीमधील सिलक्याला बोगद्यातून मजुरांचा बचाव करण्याचे प्रयत्न अखंड सुरू आहे. आज या बचतकार्याचा (20 नोव्हेंबर) नववा दिवस आहे.या बचावासाठी पाच पर्याय निवडण्यात आले आहेत. रस्ते वाहतूक मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या एका निवेदनात हे पाच पर्याय सांगितले आहेत.
 
12 नोव्हेंबरला सिलक्यारा ते बारको या भागाला जोडणाऱ्या बोगद्याचा एक भाग सिलक्यारा भागाच्या दिशेने कोसळला. तेव्हापासून 41 मजूर तिथे अडकले आहेत. त्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकारने युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू केलं आहे.
 
तज्ज्ञांच्या मते त्या चिखलाच्या ठिकाणी 900 मिमीचा पाईप टाकावा. तो मजुरांपर्यंत जाण्याचा सगळ्याxत चांगला पर्याय होता.
 
मात्र 17 नोव्हेंबरला त्या बोगद्याची सुरक्षा अबाधित ठेवून हा पाईप टाकणं शक्य झालं नाही. त्यामुळे जितक्या शक्य तितक्या संस्था एकत्र येऊन हे बचाव कार्य करण्याचा पर्याय निवडला गेला.
 
 
त्यानुसार खालील पाच संस्था एकत्र येऊन हे काम करत आहेत.
 
ऑईल अँड नॅचरल गॅस कोऑपरेशन (ONGC)
सतलज जल विद्युत निगम
रेल विकास निगम लिमिटेड
नॅशनल हायवे ऍन्ड इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NHIDCL)
टेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (THDCL)
अडकलेल्या मजुरांशी सातत्याने संपर्क ठेवला जात असल्याची माहिती भारत सरकारने दिली आहे. ज्या भागात मजूर अडकले आहेत तो भाग 8.5 मी उंच आणि 2 किमी लांब आहे.
 
बोगद्याचा हा भाग बांधला गेला आहे. तिथे पाणी आणि वीज उपलब्ध आहे. मजूरांना एका 4 इंचाच्या पाईपलाईनमधून चणे, मुरमुरे, ड्रायफ्रूट आणि औषधं दिली जात आहेत.
 
NHIDCL कडून 6 इंचाची एक पाईपलाईन खोदली जात आहे. 60 मीटरपैकी 39 मीटर बांधकामाचं काम पूर्ण झालं आहे. एकदा हे काम पूर्ण झालं की त्यांना खाद्यपदार्थ देता येतील असंही सरकारने सांगितलं आहे.
 
NHIDCL सिलक्याऱ्या भागातून खड्डा खणणार आहे. त्यासाठी लष्कराचीही मदत घेण्यात आली आहे. Tehri Hydroelectric Development Corporation बारकोट भागाच्या टोकापासून बोगदा खोदणार आहे. त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
 
सतलज जल विद्युत निगम लिमिटेडकडून वरच्या भागातून ड्रिलिंग केलं जाणार आहे. त्यासाठी मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे. या मशीन्स रेल्वेमार्फत हलवल्या जाणार असून गुजरात आणि ओडिशा राज्यातून या मशीन्स येणार आहेत.
 
ONGC संस्था सुद्धा खोलवर ड्रिलिंग करण्यात तज्ज्ञ आहे. तेही या कामात सहभागी होतील.
 
पंतप्रधानांचं बारीक लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना फोन करून बचाव कार्याची माहिती घेतली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने या मजुरांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्री धामी यांनीही सद्यस्थितीची माहिती घेतली. आतापर्यंत तीन वेळा मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
 
सर्व मजूर आत सुरक्षित असल्याची माहिती मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली आहे.
 












Published By- Priya Dixit