मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 13 सप्टेंबर 2017 (17:32 IST)

दिल्ली विद्यापीठात NSUI चा विजय

दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला (ABVP)झटका देत काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने (NSUI) दणदणीत विजय मिळवला आहे. ‘एबीव्हीपी’चे वर्चस्व संपुष्टात आणत ‘एनएसयूआय’ने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावर कब्जा केला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एनएसयूआयच्या रॉकी तुसीद याने एबीव्हीपीच्या रजत चौधरी याचा पराभव केला. तर उपाध्यक्षपदावरही एनएसयूआयच्या उमेदवाराने विजय मिळवला. एबीव्हीपीला सचिव आणि सहसचिवपदावर समाधान मानावे लागले.