शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 23 सप्टेंबर 2017 (10:33 IST)

रोहिंग्यांच्या प्रश्नी दै.सामानातून टीका, ओवैसी यांना केले टार्गेट

म्यानमारमधील राखीन प्रांतात रोहिंग्या मुस्लिमांवर होणा-या अन्यायाविरोधात भारतात गेल्या काही दिवसांपासून निदर्शनं, आंदोलन होत आहेत. यावरुन रोहिंग्या मुस्लिमांना पाठिंबा दर्शवणा-यांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून टीकास्त्र सोडले आहे. शनिवारच्या सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांना टार्गेट केले आहे. ''रोहिंग्यांना म्यानमारमधून पलायन का करावे लागले याचे उत्तर येथील फडतूस मानवतावाद्यांनी आधी द्यावे. हिंदुस्थानातील मुसलमानांच्या मतांवर डोळा ठेवून रोहिंग्यांना सहानुभूती दाखवणे ही देशद्रोहाची शेवटची सीमाच म्हणावी लागेल. ज्यांना रोहिंग्या आपले भाऊ वाटतात अशा पुढाऱयांनी रोहिंग्यांसाठी हिंदुस्थानच्या बाहेर धर्मशाळा उघडाव्यात व त्यांच्याशी आपल्या पोरीबाळींचे निकाह जरूर लावावेत, पण हिंदुस्थानच्या मातीचा चिखल करून विझलेल्या तवंगावर पेटती काडी फेकू नये. रोहिंग्यांना भटके मानणारे मानवतेचे पुजारी नसून देशाचे दुश्मन आहेत. तेव्हा रोहिंग्यांची भाईगिरी तुमच्या लुंगीतच ठेवा!!'', अशा बोच-या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.