बुधवार, 15 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 12 नोव्हेंबर 2018 (09:26 IST)

पाकचा भ्याड हल्ला, महाराष्ट्राचा वीर जवान शहीद

व्यर्थ न हो बलिदान... नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील जवान केशव गोसावी हे पाकिस्तानी सैन्याद्वारे करण्यात आलेल्या गोळीबारात शहीद..
 
पाकिस्तान लष्कराकडून युद्ध बंदीचे उल्लंघन सुरुच आहे. रविवारी दुपारी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात नौशेरा सेक्टरमध्ये तैन्यात असलेले सिन्नर तालुक्यातील श्रीरामपूर (शिंदेवाडी) येथील जवान केशव सोमगीर गोसावी (२९) हे शहीद झाले.
 
रविवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास पाकिस्तानी लष्कराने नौशेरा सेक्टरमधील प्रत्येक्ष नियंत्रण रेषेवर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये जवान केशव गोसावी यांना गोळी लागुन ते जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.
 
भारतीय सैन्य दलातील मराठा बटालीयन चे जवान केशव सोमपुरी गोसावी रा.शिंदेवाडी हे काही वेळापुर्वी जम्मु काश्मीर येथे आतंकवादी हल्ल्यात शहीद झाले आहेत.त्यांचे पार्थीव उद्या दुपारी १२.३० वाजता ओझर विमानतळावर येईल त्यांनंतर ३ वाजेपर्यंत शिंदेवाडी येथे येईल अशी माहीती शासकीय यंञणेकडुन मिळत आहे. त्यांच्या  पश्चातवडील सोमगिर गोसावी, पत्नी यशोदा केशव गोसावी दोन विवाहीत बहीणी आहेत.ते वडलांना एकुलते एक होते.त्यांच्या पत्नी गरोदर आहेत. शहीद जवान केशव गोसावी यांचे ४ थी पर्यतचे प्राथमिक शिक्षण जि.प.शाळा शिंदेवाडी येथे,माध्यमिक शिक्षण न्यु इंग्लिश स्कुल पंचाळे येथे व १२ वी पर्यँतचे शिक्षण वावी येथे झाले असुन वयाच्या २९ व्या वर्षी आतंकवादी हल्ल्यात ते शहीद झाले आहेत.