गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पाकचे पितळ उघडे पडले, भारताने पाडलेल्या F-16 विमानाचे अवशेष सापडले

दुनियासमोर पाकिस्तानचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे. बुधवारी भारतीय हवाई दलाला जम्मू- काश्मीरमधील नौशेरा येथे घुसखोरी करणारे पाकिस्तानचे F-16 हे लढाऊ विमान पाडण्यात यश आले होते. हे विमान पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये जाऊन पडलं होतं. परंतू पाक हे स्वीकारायला तयार नव्हता. आता या विमानाचे अवशेष सापडले असून यासंबंधीचा फोटो समोर आला आहे. 
 
सूत्रांप्रमाणे हा फोटो पाक अधिकृत काश्मिरचा आहे. या फोटोत पाकिस्तानी अधिकारी विमान पडलेल्या ठिकाणी पाहणी करतानाही दिसत आहे. माहितीनुसार, F-16 विमान भारतीय हवाई दलाच्या मिग 21 विमानाने पाडण्यात आले होते. पाकिस्तान स्वत:चे विमान पडल्याचे नकारात असताना आता हे फोटो पाकला खोटं सिद्ध करत आहे.
 
सोशल मीडियावर हाच फोटो भारताच्या मिग विमानाचा असल्याचं सांगत व्हायरल झाला होता. मात्र भारतीय हवाई दलाने हा फोटो पाकिस्तानच्या एफ16 विमानाचा असल्याची खात्री दिली आहे. फोटोत पाकिस्तानी सेनेचे अधिकारी देखील दिसत आहेत. माहितीनुसार, पाकिस्तानच्या 7 नॉर्थन लाइट इन्फंट्रीचे कमांडिंग अधिकारी आहेत. (Photo courtesy: ANI)