रविवार, 7 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

वडोदरात पाणीपुरीवर बॅन, जाणून घ्या कारण....

pani puri ban
पाणी पुरी म्हटलं की तोंडाला पाणी सुटायला लागतं, असं कोणीच नसेल ज्याने चमचमीत पाणी पुरीचा स्वाद घेतला नसेल. स्पाइसी पाण्यासोबत मिळणारा हा पदार्थ देशात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. गोलगप्पे पानी पताशे, पुचका, असे कितीतरी नावं आहेत परंतू गुजरातच्या वडोदरा येथील स्वादप्रेमी आता हा स्वाद घेऊ शकणार नाही कारण येथे या पदार्थावर बंदी घालण्यात आली आहे. नगर निगमने स्वच्छतेचा हवाला देत बंदी घातली आहे.
 
वडोदरा नगर निगमप्रमाणे पावसाळ्यात पाणीपुरी बनवताना स्वच्छतेकडे दुर्लक्ष होतं ज्याने आजार पसरतात. याच कारणामुळे गुजरातील वडोदरा शहरातील लोकं पाणीपुरीचा स्वाद घेऊ शकणार नाही. या प्रकरणात वडोदरा नगर निगमच्या आरोग्य अधिकार्‍यांनी 50 जागी छापे मारले. यानंतर विक्रीवर बंदी घालण्यात आली.
 
छापेमारीत निम्न क्वालिटीचे तेल, खराब झालेले पीठ, बटाटे आणि चणे जप्त केले गेले. या निम्न गुणवत्तेच्या वस्तूंचा वापर करून पाणी पुरी तयार केली जात होती. याच कारणामुळे आता शहरातील लोकांना पाणीपुरी खाण्याची भीतीच बसली आहे.
 
निगमद्वारे वडोदराच्या हुजरात पागा, हाथीखाना, तुलसीवाडी, समा, छाणीगांव, खोडियारनगर, नवायार्ड, वारसीया नरसिंह टेकरी, सुदामा नगर सारख्या क्षेत्रांमध्ये छापे मारले गेले. या दरम्यान 4000 किलो पाणीपुरी, 3500 किलो बटाटे-चणे, 20 किलो तेल, 1200 लीटर ऍसिड मिसळलेलं पाणी जप्त करण्यात आले.