1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

कास्टिंग काऊच ची मी सुद्धा पीडित आहे: रेणुका चौधरी

“कास्टिंग काऊच केवळ फिल्म इंडस्ट्रीमध्येच होतं असं नाही, तर प्रत्येक ठिकाणी होतं. महिला खासदार यातून सुटलेल्या आहेत असं समजू नये. त्यामुळे आता हा मुद्दा उपस्थित करुन, देशाने एकत्र होणं गरजेचं असून, Me Too अर्था मी सुद्धा पीडित आहे”, असं म्हणायला हवं, असं रेणुका चौधरी यांनी सांगितले.  तर "फिल्म इंडस्ट्री कोणत्याही मुलीवर बलात्कार करुन  सोडून देत नाही, तर त्यांना काम आणि रोटी पण देते,"  असं म्हणत सरोज खान यांनी एकप्रकारे कास्टिंग काऊचचं समर्थन केलं. त्यानंतर  आपल्या या विधानावर सरोज खान यांनी माफीही मागितली आहे. मला खेद आहे, मी माफी मागते, असं त्यांनी म्हटलं.
 
दक्षिण भारतातील स्ट्रगलर अभिनेत्री श्री रेड्डीच्या आरोपांनंतर भारताच्या फिल्म इंडस्ट्रीमधील कास्टिंग काऊचवर जोरदार चर्चा रंगली आहे. त्यानंतर बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींनीही त्यांच्यासोबत कास्टिंग काऊच झाल्याचं सांगितले आहे.