testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

तर पतंजली एक ग्लोबल ब्रॅंड होणार

Last Modified शुक्रवार, 12 जानेवारी 2018 (08:59 IST)

योग गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीला एक मोठी ऑफर मिळाली आहे. आता ही ऑफर प्राथमिक स्तरात आहे. मात्र या ऑफरनंतर पतंजली एक ग्लोबल ब्रॅंड म्हणून नावारूपाला येईल. फ्रान्सच्या लग्जरी ग्रुप एलवीएमएचने पतंजली आयुर्वेदात भागीदारी घेण्याची इच्छा वर्तवली आहे. यासाठी ते ५० कोटी डॉलर देण्यास तयार आहेत.

एलव्हीएमएच कंपनीनुसार, पतंजली मॉडलमध्ये मल्टीनॅशनल आणि फॉरेन इंव्हेस्टमेंटची इच्छा नसून कंपनीसोबत बिजनेस करण्याची इच्छा आहे. एलव्हीएमएचसोबत कंपनी आपले प्रॉडक्टस अमेरिका, जपान, चीन, दक्षिण कोरिया आणि युरोपमध्ये विकेल. त्याचबरोबर पतंजली एक ग्लोबल कंपनी होण्यास मदत होईल.

पतंजलीचे एमडी आचार्य बालकृष्ण यांनी सांगितले की, ते कंपनीचा काही भाग विकणार नाही. मात्र पतंजली ५००० कोटींचे कर्ज घेऊ इच्छित आहे. कंपनीला कमी दरात कर्ज मिळण्याची आशा आहे.यावर अधिक वाचा :