मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मे 2020 (07:11 IST)

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आज संध्याकाळी ७ वाजता देशातल्या कम्युनिटी रेडिओंशी संवाद साधणार

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आज संध्याकाळी ७ वाजता देशातल्या कम्युनिटी रेडिओंशी संवाद साधणार आहेत. एकाच वेळी देशातल्या सर्व कम्युनिटी रेडिओ केंद्रावर हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल.
 
ही चर्चा हिंदी आणि इंग्रजी या दोन विभागांत प्रसारित केली जाईल. श्रोते एफएम गोल्ड वर हिंदीमध्ये सायंकाळी साडे सात वाजता, आणि इंग्रजीत रात्री ९ वाजून १० मिनिटांनी हा कार्यक्रम ऐकू शकतात.
 
प्रथमच केंद्रीय मंत्री कम्युनिटी रेडिओ केंद्रांच्या श्रोत्यांना एकाच वेळी संबोधित करणार आहेत. या संवादादरम्यान ते कम्युनिटी रेडिओ केंद्रांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरंही देतील.