testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

हिंदी पक्की नसल्यामुळे पंतप्रधान नाही बनलो : मुखर्जी

Last Modified शनिवार, 21 ऑक्टोबर 2017 (10:47 IST)

“माझी हिंदी कच्ची होती. मला जनतेची भाषा अर्थात हिंदी पक्की येत नसल्यामुळे पंतप्रधान होता आले नाही, असे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितले.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच पंतप्रधानपदासाठी प्रणव मुखर्जी योग्य व्यक्ती होते, असे वक्तव्य माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले होते.

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात डॉ.सिंग हे काँग्रेससाठी सर्वोत चांगले पर्याय होते. पंतप्रधानपदासाठी मी चांगला पर्याय नव्हतो. हिंदी भाषेवर माझे प्रभुत्व नव्हते. त्यामुळे जनतेशी संवाद साधता येत नव्हता. जनतेशी संवाद साधणारी भाषा येत नसेल तर कोणतीही व्यक्ती पंतप्रधान होऊ शकत नाही, असे मुखर्जी म्हणाले.यावर अधिक वाचा :