शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

रामभक्त राहुल गांधी अयोध्यात बांधतील भव्य राम मंदिर, भोपाळमध्ये लागले पोस्टर

लोकसभा निवडणूक आल्यामुळे अचानक पुन्हा राम मंदिर मुद्दा पुन्हा चर्चेत आहेत. अयोध्यामध्ये भव्य राम मंदिर बांधण्याची मागणी करणारे विश्व हिंदू परिषदने आपले पाऊल मागे खेचून घेतले. पण दुसरीकडे यावर चूप राहणारा पक्ष काँग्रेस आता राम मंदिरावर समोर येऊन बोलत आहे. काँग्रेस नेते दावा करू लागले आहे की भव्य राम मंदिराचे निर्माण काँग्रेसच्या सरकारात पूर्ण होईल.
 
अशात लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचाराचे शंखनाद करण्यासाठी आठ फेब्रुवारीला भोपाळ येत असलेल्या काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून पोस्टर लावण्यात आले आहे ज्यात राहुल गांधी यांना राम भक्त असल्याचे दर्शवले गेले आहे. आणि अयोध्यात राम मंदिर निर्माण राहुल गांधी याच्या द्वारे होईल.
 
भोपाळमध्ये राहुल गांधी यांच्या कार्यक्रम स्थळ जंबूरी मैदानाकडे जाणार्‍या रस्त्यावर काँग्रेस नेते सतीश मालवीय यांच्या द्वारे लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये मुख्यमंत्री कमलनाथ यांना हनुमान आणि गौ भक्त आणि राहुल गांधी यांना रामभक्त असे दर्शवत त्यांचा स्वागत करत लिहिले आहे की अयोध्यामध्ये राहुल गांधी हेच राम मंदिर निर्माण करवतील. राहुल गांधी यांच्या स्वागत हेतू लागलेल्या या पोस्टरमुळे पुन्हा एकदा देशातील राजकारण चर्चेला सुरुवात झाली आहे. 
 
राम मंदिर मुद्द्यावर काही दिवसांपूर्वीच प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभ मेळ्यात दोन धर्म संसद आयोजित केल्या गेल्या होत्या.
 
यानंतर शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती 21 फेब्रुवारीला अयोध्यात राम मंदिर शिलान्यास कार्यक्रमाची घोषणा आधीच करून चुकले आहेत, दुसरीकडे काँग्रेस समर्थक मानले जाणारे कंप्यूटर बाबा देखील राम मंदिर निर्माणासाठी संतांना एकत्र करण्याचा प्रयत्नात आहे. उल्लेखनीय आहे की यापूर्वी देखील विधानसभा निवडणूक दरम्यान जेव्हा राहुल गांधी भोपाळमध्ये प्रचारासाठी आले होते तेव्हा देखील कार्यकर्त्यांनी त्यांना शिवभक्त असल्याचे सांगितले होते.