शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 डिसेंबर 2023 (10:36 IST)

Rajasthan: एकाच कुटुंबातील 5 जणांची आत्महत्या

suicide
बिकानेरच्या मुक्ता प्रसाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि तीन मुलांचा समावेश आहे. यापैकी चार जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले, तर एकाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलीस  घटनास्थळी पोहोचले. पाचही मृतदेह पीबीएम रुग्णालयाच्या शवागारात नेण्यात येत आहेत.आर्थिक त्रासाने ग्रस्त असल्यामुळे या कुटुंबाने असे टोकाचे पाउल घेतले. ही घटना मुक्ता प्रसाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंत्योदय नगरमध्ये घडली असून हे कुटुंब बस्ती परिसरात राहत होते. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताप्रसाद नगर पोलीस ठाण्याच्या अंत्योदय नगरमध्ये राहणारे हनुमान सोनी, त्यांची पत्नी आणि तीन मुलांनी गुरुवारी दुपारी आत्महत्या केली. हे कुटुंब कर्जबाजारी झाले होते. या मुळे  पती-पत्नीने मुलांसह आत्महत्या केली. पहिल्या चार जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजते. तर एकाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. मृतांमध्ये पती-पत्नीशिवाय त्यांची दोन मुले आणि एका मुलीचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत.
 
Edited by - Priya Dixit