testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

तमिळनाडू : रजनीकांतला मिळणार 33 जागा

चेन्नई| Last Modified गुरूवार, 18 जानेवारी 2018 (12:26 IST)
दाक्षिणात्य सुपरस्टार 'थलैवा' रजनीकांत यांनी राजकारण प्रवेशाचा निर्णय घेतल्यामुळे तमिळनाडूतील राजकारण ढवळून निघाले असून रजनीच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, या उत्साहावर विरजण टाकणारी एक बातमी समोर आली आहे. तमिळनाडूत आता लगेच मध्यावधी निवडणुका झाल्यास रजनीकांतच्या पक्षाला 234 जागांपैकी अवघ्या 33 जागा मिळतील, असे एका पाहणीतून पुढे आले आहे.
इंडिया टुडे आणि कार्वी यांनी संयुक्तपणे हा सर्व्हे केला आहे. रजनीकांत यांनी अद्याप पक्षाच्या नावाची घोषणा केलेली नाही. अभिनेता म्हणून त्यांची लोकप्रियता अफाट
असली तरी राजकारणाच्या मैदानात त्यांना तितका प्रतिसाद मिळणार नाही. त्यांच्या पक्षाला केवळ 16 टक्के मते मिळतील, असा या सर्व्हेचा अंदाज आहे. त्याचवेळी, करुणानिधी यांच्या द्रमुकला 130 जागा मिळण्याचा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे.

2016 च्या विधानसभा निवडणुकीत डीएमकेला 98 जागा मिळाल्या होत्या. सर्वाधिक नुकसान माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या अण्णा द्रमुक पक्षाचे होण्याची शक्यता आहे. जयललिता यांच्या निधनानंतर पक्ष नेतृत्वहीन झाला असल्याने अण्णा द्रमुकला केवळ 68 जागांवर समाधान मानावे लागणार असे दिसत आहे.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

काँग्रेसची निवडणूक तयारी, जबाबदाऱ्याचे केले वाटप

national news
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील प्रचाराची रणनिती ठरविण्याची जबाबदारी काँग्रेसचे ...

प्रियंका गांधी लोकसभा निवडणुकीत रायबरेलीपासून उभी होईल?

national news
काँग्रेस महासचिव बनल्याबरोबर प्रियंका गांधी वाड्रा यांचे नाव प्रत्येकाच्या तोंडावर आहे. ...

‘तेजस एक्सप्रेस’मधील एलसीडी स्क्रीन काढणार

national news
‘तेसज एक्स्प्रेस’ २०१७ साली मुंबई – गोव्यादरम्यान धावायला लागली. या ट्रेनमध्ये प्रवाशांना ...

सी व्हिजन अंतर्गत 36 तासांचा विशेष उपक्रम

national news
मुंबईला टार्गेट करत 26/11 ला समुद्रमार्गे घुसले होते. या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर ...

पत्नीला आला विवाहबाह्य संबंधाचा संशय, कापले पतीचे गुप्तांग

national news
ओडिसामध्ये नबरंगपूर जिल्ह्यातील उदयपूर येथे एका महिलेने विवाहबाह्य संबंध असल्याच्या ...