testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

संघाच्या दसरा मेळाव्यात इतिहासात प्रथमच मुस्लीम पाहुणा

Last Modified सोमवार, 25 सप्टेंबर 2017 (16:28 IST)

आर एस एस अर्थात राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
नागपुरात विजयादशमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात एका मुस्लिम व्यक्तीला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित केले
आहे. यामध्ये इंग्रजी दैनिक
इकॉनॉमिक टाइम्सने हे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने
होमिओपथी डॉक्टरांना मुख्य पाहुणा म्हणून आमंत्रित करत असते मात्र इतिहासात
92 वर्षात
प्रथमच मुस्लिम व्यक्तीला हा मान प्राप्त झाला आहे. डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी

२७ सप्टेंबर १९२५ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. तेव्हा पासून नागपूर येथे दस-याला म्हणजेच विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपला स्थापनादिवस साजरा करत आहे.

मुस्लीम
बोहरा समाजाचे मुनव्वर युसूफ यांना मुख्य पाहुणे म्हणून आमंत्रित केलं आहे. यात विशेष म्हणजे की युसूफ व
त्यांच्या काकांचा सुरुवातीपासूनच आरएसएसशी संबंध राहिला आहे. एप्रिल महिन्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी बोहरा समाजाचे नेते सैय्यदाना यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली होती. संघाची प्रतिमा मुस्लीम समाजात व्यवस्थित मांडण्यासाठी हे करणायत येत आहे.यावर अधिक वाचा :