1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (14:13 IST)

रस्त्यावरील अपघातात जखमींना रुग्णालयात पोहोचवा आणि 5000 रुपये बक्षीस मिळवा

Take the injured in a road accident to the hospital and get a reward of Rs.5000 Marathi National News  Webdunia Marathi
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते अपघातात जखमींना एका तासात रुग्णालयात पोहोचवणाऱ्या व्यक्तीला 5000 रुपये बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे ही योजना रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूला रोखण्यासाठी सरकारकडून जाहीर केली आहे. ही योजना येत्या 15 ऑक्टोबर 2021 पासून सुरु होणार आहे.दर वर्षी रस्ते अपघातात तब्बल दीड लाख लोक मृत्युमुखी होतात.त्यापैकी काहींना तातडीने उपचार न मिळाल्यामुळे आपला जीव गमवावा लागतो.

रस्ते अपघातात सुरुवातीचा एक तास महत्वाचा असतो. या मध्ये उपचार मिळाल्यावर जखमी झालेल्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. पण असं होत नाही त्यामुळे सरकारने रस्ते अपघात मृत्यू दर कमी होण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. या मध्ये जो कोणी अपघातात जखमी झालेल्याना वेळीच रुग्णालयात पोहोचवेल त्याला सरकार कडून रुपये 5000 बक्षीस देण्यात येईल. रस्ते वाहतूक मंत्रालयाने याच उद्देशाने ही योजना काढली आहे. या योजने संबंधी निर्देश जारी करण्यात आले आहे.मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील परिवहन सचिवांना पत्र पाठवले आहेत.