1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018 (09:15 IST)

कुत्र्यांचं रक्तदान शिबीर संपन्न

होय, चेन्नईत मद्रास व्हेटर्निटी कॉलेजतर्फे कुत्र्यांचं रक्तदान शिबीर घेण्यात आलं. या रक्तदान शिबीरात ५० कुत्र्यांचा सहभाग होता. प्राण्यांना रक्ताची अवस्था भासली तर त्यासाठी एक ब्लड बँक असावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला. या रक्तदान शिबीरात गोळा केलेलं रक्त तनुवास रक्तपेढीमध्ये साठवलं जाणार आहे. ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत आणि त्यांना काही इजा झाली किंवा रक्ताची आवश्यकता भासली तर ते या रक्ताचा वापर करू शकणार आहे. या रक्तदान शिबीरात ५० कुत्र्यांनी सहभाग घेतला होता यापैकी ११ कुत्र्यांनी रक्तदान केलं. रक्तदान केलेल्या कुत्र्यांना डोनर कार्डही देण्यात आले आहेत.