शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 15 एप्रिल 2023 (16:42 IST)

शाहजहांपूरमध्ये भीषण अपघात, ट्रॅक्टर-ट्रॉली नदीत कोसळून 20 जणांचा मृत्यू

accident
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. ट्रॅक्टर-ट्रॉली नदीत कोसळून सुमारे 20 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे. पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. शाहजहांपूर जिल्ह्यातील तिल्हार पोलीस ठाण्याच्या बिरसिंगपूर गावाजवळ हा अपघात झाला.
 
शाहजहानपूरच्या तिल्हार पोलीस स्टेशन हद्दीतील बिरसिंगपूर गावाजवळ ट्रॅक्टर-ट्रॉलीने मोठ्या संख्येने लोक नदीवर पोहोचले होते. यादरम्यान ट्रॅक्टर-ट्रॉली पुलाचे कठडे तोडून खाली कोसळली , त्यात अनेक लोक गाडले गेले. आतापर्यंत सुमारे 20 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे, ज्यामध्ये महिला आणि काही मुलेही असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक जण जखमीही झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Edited By - Priya Dixit