शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (22:47 IST)

सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमागचं खरं कारण आलं समोर

देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालं होतं. या हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीचा अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार यांत्रिक बिघाड, घातपात किंवा दुर्लक्ष अशा शक्यता नसल्याचं स्पष्ट झालं आहे. खराब हमामानामुळं हा अपघात घडल्याचं चौकशीत समोर आलं आहे.
8 डिसेंबर 2021 रोजी तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये बिपिन रावत यांच्या Mi-17 V5 या हलिकॉप्टरला अपघात झाला होता. त्या अपघातात बिपीन राव यांच्यासह एकूण 14 जणांचा मृत्यू झाला होता.
या अपघाताच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीनं प्राथमिक अहवाल सादर केला असून, त्यात मृत्यूचं कारण देण्यात आलं आहे.
 
तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांची समिती
बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताच्या चौकशीसाठी ट्राय सर्व्हिसेस कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले होते. त्यात तिन्ही सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता.
या चौकशी समितीच्या पथकानं फ्लाईट डाटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हाइस रेकॉर्डर यांच्यातील माहितीचा अभ्यास केला. त्याचबरोबर घटनेच्या सर्व साक्षीदारांचे जबाबही नोंदवले.
त्यावरून कोर्ट ऑफ इन्क्वायरीनं कोणत्याही प्रकारचा यांत्रिक बिघाड, घातपात, निष्काळजीपणा ही अपघाताची कारणं असण्याची शक्यता फेटाळलीय.
 
हवामान बदलामुळं अंदाज चुकला
हवानात अचानक झालेल्या बदलामुळं हेलिकॉप्टर ढगांमध्ये शिरलं होतं. त्यामुळ वैमानिकाचा अवकाशीय म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज चुकला आणि हेलिकॉप्टर कोसळलं, असं या अहवालात म्हटलं आहे.
या संपूर्ण चौकशीत आढळलेल्या तथ्यांच्या आधारे कोर्ट ऑफ इन्क्वायरीनं काही सूचना केल्या असून त्याचा पुन्हा एकदा आढावा घेतला जात आहे.
 
8 डिसेंबर 2021 रोजी जनरल बिपीन राव यांनी त्यांच्या पत्नीसह तमिळनाडूच्या सुरूर एअर बेसवरून ऊटी जवळच्या वेलिंग्टनमध्ये जाण्यासाठी हेलिकॉप्टरमधून उड्डाण घेतलं होतं.
मात्र, या प्रवासा दरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी मधुलिका आणि केबिन क्रू तसंच रावत यांचा स्टाफ असे एकूण 14 जण होते. सर्वांचा या अपघातात मृत्यू झाला होता.
 
गेल्या वर्षी 8 डिसेंबर रोजी झालेल्या Mi-17 V5 विमान अपघाताच्या चौकशीच्या त्रि-सेवा न्यायालयाने काही दिवसांपूर्वी संरक्षण मंत्रालयाला आपले प्राथमिक निष्कर्ष सादर केले होते. अपघाताचे संभाव्य कारण शोधण्यासाठी तपास पथकाने सर्व उपलब्ध साक्षीदारांची तपासणी केली. याशिवाय फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचेही विश्लेषण करण्यात आले. तांत्रिक बिघाड, तोडफोड किंवा निष्काळजीपणा हे अपघाताचे कारण असल्याचा निकाल कोर्ट ऑफ इन्क्वायरीने दिला आहे. खोऱ्यातील हवामानात अनपेक्षित बदल झाल्याने ही दुर्घटना घडली. खराब हवामानामुळे पायलटला मार्ग समजू शकला नाही आणि विमान नियंत्रणाबाहेर गेल्याचे अहवालात म्हटले आहे. त्याच्या निष्कर्षांच्या आधारे, कोर्ट ऑफ इन्क्वायरीने काही शिफारसी देखील केल्या आहेत ज्यांचे पुनरावलोकन चालू आहे.विशेष म्हणजे, हवाई प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखालील त्रि-सेवा तपास पथकाने सीडीएस बिपिन रावत हेलिकॉप्टर अपघाताचा अधिकृत अहवाल 5 जानेवारी रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना सादर केला. सीडीएस रावत हेलिकॉप्टर अपघात हा सीएफआयटी (कंट्रोल्ड फ्लाइट इनटू टेरेन) अपघात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अशा अपघातांमध्ये पायलट किंवा क्रूला खूप उशीर होईपर्यंत धोक्याची कल्पना नसते.