गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017 (11:48 IST)

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचालींना पुन्हा वेग आला आहे. गुरुवारी रात्री अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह दहा मंत्र्यांनी आपले राजीनामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सादर केले. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. काही मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल केला जाण्याची चर्चा आहे.

नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दहा मंत्र्यांना चर्चेसाठी बोलावले होते. त्यावेळी या आठही जणांनी आपले राजीनामे सादर केले. त्यामध्ये अर्थमंत्री अरुण जेटली, श्रम राज्यमंत्री जितेंद्र प्रसाद, कृषिमंत्री राधामोहन सिंग, वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारामन, जलसंपदा व नदी विकासमंत्री उमा भारती, कौशल्य विकासमंत्री राजीव प्रताप रुडी, लघुउद्योग मंत्री, कलराज मिश्र यांचा समावेश होता. आठवे नाव मात्र गुलदस्त्यात आहे. याशिवाय मनुष्यबळ विकासमंत्री महेंद्र पांडे आणि कृषिराज्यमंत्री संजीवड बलियन यांनीही राजीनामा दिल्याचे समजते. रुडी यांच्या कामगिरीवर पंतप्रधान मोदी नाराज असल्यानेच त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याचे  बोलले जात आहे. तर दुसरीकडे उमा भारती यांनी प्रकृतीचे कारण पुढे करत मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला आहे.