सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (13:01 IST)

बायको प्रेयसी बनून पतीला भेटायला गेली, मग रस्त्यावर धुतलं

बायकोने रंगीत नवर्‍याला अद्दल घडविण्यासाठी प्रेयसी बनून भेटायला बोलवलं आणि मग धूमाकूळ घातला आणि त्याला भररस्त्यावर धूतलं. ही घटना मध्य प्रदेशाच्या बैतूल जिल्ह्याची आहे. बायकोला अंधारात ठेवून सोशल मीडियावरील गर्लफ्रेंडशी चॅट करणं नवर्‍याला चांगलंच महागात पडलं. ऑनलाइन मैत्रीणीला पहिल्यांदाचा भेटायला गेल्या नवर्‍याला मोठा धक्का बसला. जेव्हा समोर गर्लफ्रेंडऐवजी बायको दिसली.
 
बेतूलमध्ये एका महिलेनं आपल्या नवऱ्याचा पर्दाफाश केला आहे. नवरा लपूनछपून इतर महिलांशी बोलायचा याची कल्पना बायकोला होती. त्यामुळे तिनं त्याला रंगेहाथ पकडण्यासाठी स्वत: नाव बदलून पतीसोबत चॅट करणे सुरु ठेवले आणि एक दिवस त्याला भेटायला बोलावलं. 
 
पत्नीनं सांगितलं की नवरा घरात त्रास देत होता, मारहाणही करायचा आणि घटस्फोटासाठी दबाव टाकत होता. त्याचं इतर महिलांशी बोलणे होत असल्याचे कल्पना असल्यामुळे मी ही योजना आखली. पंधरा दिवस चॅटिंग केल्यावर त्याला भेटायला बोलावलं. पतीला याबद्दल कल्पना नसल्यामुळे तो उत्साहात  नव्या प्रेयसीला भेटायला पोहचला तेव्हा महिला तोंड झाकून उभी होती पण जेव्हा तिने झाकलेला चेहरा दाखवला तर पती पूर्णपणे हादरला कारण फोनवर बोलत असलेली प्रेयसी दुसरी तिसरी कुणी नाही तर आपली बायकोच आहे हे त्याला समजलं. 
 
बायको पूर्ण तयारीने गेली होती. पतीची धुलाई करण्यासाठी तिनं आपल्या बहिणींनाही सोबत नेलं होतं. भररस्त्यात बायको आणि मेहुणींनी त्याला धुतलं. लोकांनी याचा व्हिडिओही व्हायरल केला.