बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोलापूर , शुक्रवार, 20 मार्च 2020 (14:48 IST)

यशवंतपूर-अहमदाबाद एक्सप्रेससह आठ गाड्यांच्या मार्गात बदल

गुत्ती स्थानकाऐवजी गुल्लापलू कल्लुरूार्गे धावणार
 
यशवंतपूर- अहदाबाद एक्सप्रेससह आठ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले असून या गाड्या दक्षिण मध्य रेल्वेमधील गुत्ती स्थानकाऐवजी गुल्लापलू, कल्लुरू स्थानकामार्गे धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाचवतीने देण्यात आली आहे. 
 
गाडी क्रमांक 16502 यशवंतपूर- अहमदाबाद एक्सप्रेस 22 मार्च रोजी कल्लुरू, गुल्लापल्यामू, गुंटकलमार्गे, 16501 अहमदाबाद- यशवंतपूर एक्सप्रेस 24 मार्च रोजीगुंटकल, गुल्लापल्यामू, कल्लुरूमार्गे, 16331 मुंबई- तिरूवअनंतपूरम एक्सप्रेस 23 मार्च रोजी गुंटकल, गुल्लापल्यामू, कल्लुरुमार्गे, गाडी क्रमांक 16332 तिरूवअनंतपूरम - मुंबई एक्सप्रेस 21 मार्च रोजी कल्लुरू, गुल्लापल्यामू, गुंटकलमार्गे, 16567 तुतीकोरीन-ओखा एक्सप्रेस 22 मार्च रोजी कल्लुरू, गुल्लापल्यामू, गुंटकल, 19568 ओखा- तुतीकोरीन एक्सप्रेस गुंटकल, गुल्लापल्यामू, कल्लुरू, 16340 नागरकोईल-मुंबई एक्सप्रेस कल्लुरु, गुल्लापल्यामू, गुंटकल, 16339 मुंबई- नागरकोईल एक्सप्रेस गुंटकल, गुल्लापल्यामू, कल्लुरूमार्गे धावणार आहेत.
 
पुणे-हैदराबाद एक्सप्रेस, सेवेच दिवसात बदल
दक्षिण मध्य रेल्वेने पुणे हैदराबाद- पुणे एक्सप्रेस या गाडीच्या सेवेच दिवसात बदल केला आहे. गाडी क्रमांक 17014 हैदराबाद- पुणे ही गाडी आठवड्यातून रविवार, मंगळवार, शुक्रवारी धावत होती. आता यामध्ये बदल करण्यात आला असून 1 एप्रिल पासून ही गाडी मंगळवार ऐवजी बुधवारी धावणार आहे. त्यामुळे मार्च मंगळवारी धावणारी ही गाडी रद्द करण्यात आली आहे. रविवारी व शुक्रवारी सेवेच्या दिवसात बदल केलेला नाही. तसेच गाडी क्रमांक 17013 पुणे-हैदराबादएक्सप्रेस ही गाडी आठवड्यातून सोमवार, बुधवार व शनिवारी धावत होती. 2 एप्रिल पासून ही गाडी बुधवार ऐवजी गुरुवारी धावणार आहे. त्यामुळे 1 मार्च बुधवारी धावणारी ही गाडी रद्द करण्यात आली आहे.
 
तरी प्रवाशांनी गाड्यांच्या मार्गात केलेल्या बदलाची तसेच गाड्यांच्या सेवेच्या दिवसात केलेल्या बदलाची माहिती घेऊनच पुढील प्रवास करावा आणि रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वे सोलापूर विभागाचवतीने करण्यात आले आहे.