1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

गाय मुस्लिमांचीही माता: शंकराचार्य

हरिद्वार- गाय केवळ हिंदू नाही तर मुस्लिमांचीही माता आहे. गायीचं दूध जितकं हिंदू धर्मियांएवढंच मुस्लिम धर्मियांसाठी सुद्धा लाभदायक आहे‘, असे द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी म्हटले.
 
ते म्हणाले, गायीच्या दुधाने जेवढं प्रोटीन हिंदू नागरिकांना मिळतं तेवढेच मुस्लिमांनाही मिळतं. यामुळे गाय ही मुस्लिमांचीही माता आहे हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. धर्म कोणातही असो तरी गाईला वाचवणे देशाच्या हिताचे आहे. देशभरात अनेक ठिकाणी गोहत्येविरोधात कायदे बनण्यात आले आहे यात काही चुकीचे नाही.
 
शंकराचार्य म्हणाले गोहत्येसोबतच आता गोमांस विक्रीवर बंदी आणणारा कायदा आणला पाहिजे. गायीकडून प्राप्त होणारी एकूण एक वस्तू जसे दुध, गोमुत्र आणि इतर सर्व काही उपयोगी आहे. एवडंच नव्हे तर तिच्या मृत्युनंतरही कातडी व हाडांचाही उपयोग होतो, म्हणून ती पूजनीय आहे आणि ‍गायीचे संरक्षण करणे आवश्यक आहे.