1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 30 ऑगस्ट 2014 (13:23 IST)

नरेंद्र मोदींनी सोडले मौन, म्हणाले, पाककडून शांततेचा तमाशा!

पाकिस्तानने भारतासोबत चर्चेआधीच जम्मू-काश्मीरातील फुटीरतावादी नेत्यांच्या भेटीगाठी  घेऊन शांतता प्रस्थापित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा तमाशा केला, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्यावर पहिल्यांदा मौन तोडले आहे. काश्मिरातील फुटिरतावादी नेत्यांना पाकिस्तानने गोंजारल्यामुळे परराष्ट्र सचिव स्तरावरील द्विपक्षीय बोलणी रद्द करण्या्चा निर्णय भारताला घ्यावा लागला. भारताचा निर्णय योग्य असल्याचेही  मोदी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, दोन्ही देशांतील संबंध वृद्धिंगत करू, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासोबत ठरले होते. त्यासाठी परराष्ट्र सचिवांच्या भेटी सुरू करायच्या होत्या. परंतु या बोलणी होण्याआधीच पाकिस्ताने फुटीरवाद्यांची गाठीभेटी घेतल्या.

मोदी म्हणाले, आम्हाला पाकिस्तानसोबत मैत्रीपूर्ण, शांततामय आणि सहकार्याचे संबध हवे आहेत. सिमला करार आणि लाहोर जाहीरनाम्याअंतर्गत कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. मात्र मी एक गोष्ट सांगू इच्छितो की, फलदायी चर्चेसाठी हिंसाचार आणि दहशतवादमुक्त वातावरण गरजेचे आहे.